शेतीसाठी जमीन आणि माती
जमीन आणि माती या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. मराठीत बऱ्याच वेळा हे दोन शब्द आपण सहजपणे, फारसा विचार न करता एकाच अर्थाने वापरतो. आज आपण या दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. उत्पादक, सुफला माती आणि जमीन ही सर्वकाळी, सर्व मानवजातीची गरज राहिलेली आहे. आपले अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे आणि म्हणून त्यांची देखभाल करणे, योग्य निगा …